निधी संकलनासाठी खंडाळी येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:33+5:302021-02-06T04:30:33+5:30
तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन परभणी : केंद्र शासनाच्या नाफेड व पीएसएस योजनेंतर्गत हमीभाव तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन १ फेब्रुवारी ...

निधी संकलनासाठी खंडाळी येथे बैठक
तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन
परभणी : केंद्र शासनाच्या नाफेड व पीएसएस योजनेंतर्गत हमीभाव तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी पूर्णा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने करण्यात आले. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तालुका खरेदी-विक्री संघाकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर तूर विक्रीसाठी आणावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संजय लोलगे, के.जे. शेवाळे, बापूराव घाटोळ, एकनाथ लोखंडे, गोरखनाथ भोसले, सावंत आदींची उपस्थिती होती.
बी.एम. सूर्यवंशी यांचा सत्कार
परभणी : महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी बी.एम. सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. याबद्दल महासंघाचे माजी कोषाध्यक्ष एम.एस. टेकाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. हरिभाऊ पाटील, बी.आर. आव्हाड, बाळासाहेब वाघमारे, अरुण पाठक, एम.डी. पौळ, डी.एस. महाजन, संजय सराफ, श्रीपाद जोशी, एन.एम. पौळ, एस.एस. खुडे, वसंत गरुड, अशोक सावळीकर आदींची उपस्थिती होती.