मेडिकल विद्यार्थ्यांनो...बाँड सेवा करा किंवा १०,00,000 भरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST2021-04-22T04:17:38+5:302021-04-22T04:17:38+5:30
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने एक आदेश काढला आहे. त्यात शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमाचा पदवी घेणाऱ्या ...

मेडिकल विद्यार्थ्यांनो...बाँड सेवा करा किंवा १०,00,000 भरा...
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने एक आदेश काढला आहे. त्यात शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमाचा पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची बंधनपत्रित सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. पुरेसे प्रशिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याने ग्रामीण, दुर्गम तसेच आदिवासी भागांमध्ये बंधपत्रित सेवेच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी काही कालावधीसाठी का होईना डॉक्टर मिळतील, असे वैद्यकीय शिक्षण विभागाला वाटते. असे असले तरी या निर्णयामुळे विद्यार्थी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.
गावात सेवा नको रे बाबा
बहुतांश विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांची तयारी करायची असते. त्यामुळे त्यांचे ग्रामीण भागात सेवा करण्याऐवजी पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश कसा मिळेल, हेच लक्ष असते. त्यामुळे त्यांना गावात सेवा नको वाटते.
मेडिकल पदवीच्या अंतिम वर्षातील इतर शहरात शिक्षण घेणारे जिल्ह्यातील विद्यार्थी
५००