५ नोव्हेंबर रोजी महापौरांची निवड
By Admin | Updated: October 22, 2014 13:28 IST2014-10-22T13:28:24+5:302014-10-22T13:28:24+5:30
परभणी महानगरपालिकेच्या महापौरांची ५ नोव्हेंबर रोजी निवड होणार असून या संदर्भातील शासनाचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिली.

५ नोव्हेंबर रोजी महापौरांची निवड
परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौरांची ५ नोव्हेंबर रोजी निवड होणार असून या संदर्भातील शासनाचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिली.
परभणी महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षासाठी ओबीसी महिलासाठी राखीव झाले आहे. या संदर्भात मुंबई येथे १६ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर आता महापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी महापौरांची निवड होणार आहे. परभणी महानगरपालिकेत ६५ सदस्य संख्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ३0, काँग्रेसचे २३, शिवसेनेचे ८, भाजपाचे २ आणि अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. महानगरपालिकेत काँग्रेस हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. महापौर प्रताप देशमुख यांचा कार्यकाळ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे, त्यामुळे नव्या महापौरांची निवड ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय खेळींच्या पार्श्वभूमीवर होणारी महापौरांची निवड महत्त्वपूर्ण राहणार आहे. नूतन महापौर निवडीत राष्ट्रवादी काँग्रेेसकडून महापौर प्रताप देशमुख हेच किंगमेकर राहणार आहेत. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने महापालिकेत काही चमत्कार घडतो का?अशी चर्चा सुरु झाली आहे. वरपूडकर यांना मानणारा राष्ट्रवादीत नगरसेवकांचा एक गट आहे. शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्षसुरेश देशमुख यांचीही भूमिका या प्रकरणी महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे./ राष्ट्रवादीकडून सात तर काँग्रेसकडून दोन दावेदार
४/महापौरपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे या पदासाठी ७ दावेदार आहेत. तर काँग्रेसकडे स्वाती खताळ व संगीता मुळे या दोन नगरसेविका दावेदार आहेत.
/(वार्ताहर)