मटकऱ्हाळा, पिंपरी, सावनगीत लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:12+5:302021-06-06T04:14:12+5:30

आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा, पिंपरी देशमुख, सावंगी ...

Matkarhala, Pimpri, Sawangeet vaccination | मटकऱ्हाळा, पिंपरी, सावनगीत लसीकरण

मटकऱ्हाळा, पिंपरी, सावनगीत लसीकरण

आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा, पिंपरी देशमुख, सावंगी आणि मांगणगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित कोरोना विषयक जनजागृती मोहिमेचे उद्घाटन आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गजानन देशमुख, दिनेश बोबडे, अरविंद देशमुख, बाळासाहेब डुकरे, शिवाजीराव गरुड, श्रीराम गरुड, डॉ. विकास भगत, डॉ. सीमा हिंगे आदी उपस्थित होते. आ. डॉ. पाटील म्हणाले, सुरुवातीला ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात कोरोना चाचण्या आणि लसीकरण करण्याविषयी भीती आणि गैरसमज होते. परंतु गेल्या महिनाभरापासून मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या वतीने शिवसैनिक, युवा सैनिक व आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्न करून नागरिकांच्या मनातील भीती व गैरसमज दूर करण्याचे काम केले ,त्यामुळे आता ग्रामीण भागातही लसीकरणास आणि कोरोना चाचण्या करून घेण्यासाठी नागरिक पुढे येत असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी भागवत गरुड, सुभाष गरुड ,श्रीराम गरुड, आरोग्य सहाय्यक डॉ. एस. पी. हातागळे, डॉ.ओमप्रकाश देशमुख, सरपंच श्वेता पंढरकर, मुंजाजी लझडे, गुणाजी बिलवरे, अशोक चोपडे, प्रल्हाद गोपने, बंडू पंढरकर, राजू वरकड, लक्ष्मण मुळे, बबन मुळे, संतोष पवार, दत्तराव मुळे, बळीराम साखरे, दत्ता अवकाळे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Matkarhala, Pimpri, Sawangeet vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.