निर्बंधाच्या वेळेनंतरही बाजार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST2021-05-03T04:12:21+5:302021-05-03T04:12:21+5:30
जिल्ह्यातील किराणा, भाजीपाला विक्रीसाठी शुक्रवारी आदेश काढण्यात आले. यामध्ये शनिवारपासून चार दिवस सकाळी ७ ते ११ दुकाने उघडण्यास परवानगी ...

निर्बंधाच्या वेळेनंतरही बाजार सुरूच
जिल्ह्यातील किराणा, भाजीपाला विक्रीसाठी शुक्रवारी आदेश काढण्यात आले. यामध्ये शनिवारपासून चार दिवस सकाळी ७ ते ११ दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार, शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस सकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. रविवारी सकाळी ११ वाजता बाजारपेठ बंद होणे अपेक्षित असताना दुपारी एकपर्यंत काही दुकाने सुरूच असल्याचे केलेल्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे, सकाळी ११ नंतर दुकाने बंद करण्यासाठी कोणतेही पथक गावामध्ये फिरकले नाही.
सर्वच दुकाने होती उघडी
प्रशासनाचे आदेश केवळ किराणा, भाजीपाला यांना विक्री करण्यास काढले होते. मात्र, यासह अन्य साहित्य विक्रीच्या दुकानांना आदेश नसताना ही दुकाने कशी सुरू होती. याकडे मात्र, दुर्लक्ष झाले.
दुकान परिसरात गर्दी
किराणा दुकानांना ११ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी होती. यानंतरही बाजारातील अनेक दुकानांच्या परिसरात तेथे काम करणारे कर्मचारी, हमाल व काही ग्राहकांची पिशव्या घेऊन खरेदीसाठी गर्दी दिसून आली. यामुळे बाजारातील निर्बंध केवळ नावालाच होते, असे दिसून आले.