शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत अडकले मानवतचे 'सीए' पती-पत्नी; मायदेशी परतण्यासाठी सरकारकडे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:35 IST

"मदतीच्या बातम्या फक्त टीव्हीवरच, आम्हाला मात्र स्वतःचा खर्च करावा लागतोय!"; दुबईत अडकलेल्या मानवतच्या दाम्पत्याची व्यथा

- मोहन बारहाते

मानवत (जि. परभणी) : मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायलदरम्यान उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका मराठवाड्यातील पर्यटकांना बसत आहे. मानवत येथील रहिवासी श्रीरंग चांडक यांचे पुत्र श्रीराम चांडक आणि सून करिष्मा चांडक हे दोघेही सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. त्यांचा परतीचा प्रवास रद्द झाला आहे. विशेष म्हणजे, अडकलेल्या भारतीयांना स्थानिक प्रशासनाकडून मदत मिळत असल्याच्या बातम्या येत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र या दाम्पत्याला स्वतःचा खर्च स्वतःच करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीराम चांडक आणि करिष्मा चांडक (दोघांचेही वय ३३) हे दोघेही पेशाने सनदी लेखापाल (सीए) असून, ते पुणे येथे स्थायिक आहेत. कामानिमित्त आणि पर्यटनासाठी हे दाम्पत्य २२ फेब्रुवारीला दुबईला गेले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार ते परतणार होते; परंतु दरम्यानच्या काळात आखाती देशांमधील परिस्थिती बिघडली. क्षेपणास्त्र हल्ले आणि हवाई क्षेत्रातील निर्बंधांमुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून, त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे.

दुबई प्रशासनाचा मदतीचा दावा फोलदुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांना तिथले प्रशासन मोफत निवास आणि भोजनाची सोय करून देत असल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांतून दिले जात आहे. मात्र, श्रीराम चांडक यांचे वडील श्रीरंग चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तवात अशी कोणतीही मदत या दाम्पत्याला मिळालेली नाही. दुबईसारख्या महागड्या शहरात त्यांना राहण्याचा आणि खाण्या-पिण्याचा खर्च पदरमोड करून करावा लागत आहे. यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण असून, मायदेशी परतण्यासाठी ते सरकारच्या मदतीची प्रतीक्षा करत आहेत.

कुटुंबीयांची चिंता वाढलीदोघेही सुरक्षित असले, तरी युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता भीतिदायक आहे. प्रशासकीय मदतीच्या केवळ बातम्या येत आहेत, प्रत्यक्षात त्यांना तिथे संघर्ष करावा लागत आहे. शासनाने त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत.- चांडक कुटुंबीय, मानवत

English
हिंदी सारांश
Web Title : Manvat couple stranded in Dubai; seek government's help to return.

Web Summary : A couple from Manvat, stranded in Dubai due to Middle East tensions, are facing hardship. Despite reports of aid, they're bearing expenses themselves, awaiting government assistance for their safe return home. The family is worried about their well-being.
टॅग्स :parabhaniपरभणी