मोफत वाळू उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST2021-04-24T04:17:08+5:302021-04-24T04:17:08+5:30
हिरकणी कक्ष गायब परभणी : येथील कर्मचारी महिला आणि प्रवासी महिलांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्यासाठी सुरू केलेला हिरकणी कक्ष ...

मोफत वाळू उपलब्ध करून द्या
हिरकणी कक्ष गायब
परभणी : येथील कर्मचारी महिला आणि प्रवासी महिलांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्यासाठी सुरू केलेला हिरकणी कक्ष बसस्थानकावरून गायब असून एसटी महामंडळाने सुरू केलेल्या हिरकणी कक्ष या योजनेला घरघर लागली आहे. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिला आणि स्थानकावर येणाऱ्या प्रवासी महिलांना त्यांच्या बाळांना योग्य प्रमाणात स्तनपान करता यावे, यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्षाची स्थापना केली. मात्र, परभणी येथील बसस्थानक हे या योजनेसाठी अपवाद आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वैयक्तिक सिंचन विहिरींना मिळेना मंजुरी
परभणी : मनरेगाअंतर्गत जिल्ह्यातील सिंचन विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. मात्र, याकडे अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परभणी तालुक्यातील ६६ अधिक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान
परभणी : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून संचारबंदीच्या निर्बंधांमुळे एसटी महामंडळाची बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरदिवशी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या परभणी जिल्ह्यातील एसटी महामंडळाला मार्च महिन्यापासून १७-१८ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यातही अनेक वेळा कडक निर्बंधांमुळे बससेवा बंद ठेवावी लागत असल्याने एसटी महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.