महावितरणच्या मुख्य प्रवेशद्वाराला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:48+5:302021-02-06T04:29:48+5:30
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलेली वीज बिल माफी ग्राहकांना न देता उलट जास्तीचे वाढीव बिल आकारले ...

महावितरणच्या मुख्य प्रवेशद्वाराला ठोकले कुलूप
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलेली वीज बिल माफी ग्राहकांना न देता उलट जास्तीचे वाढीव बिल आकारले आहे. या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करत लॉकडाऊन काळातील व त्यानंतरचे वाढीव वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता भाजपाच्या वतीने वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकत विजेच्या संबंधीच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन उपविभागीय अभियंता दिनेश भागवत यांना सादर करण्यात आले. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करून सोडून दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, ॲड. व्यंकटराव तांदळे, नंदकुमार सुपेकर, रामराव फड खादगावकर, तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके, शहराध्यक्ष श्रीनिवास मोटे, ॲड. आदिनाथ मुंडे, हिरा मेहता, गोविंद रोडे, रवी जोशी, रामेश्वर अळनुरे, माणिकराव मोरे, पद्मजाताई कुलकर्णी, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष रुपालीताई जोशी, संघमित्र गायकवाड, भास्कर जाधव, रोहिदास निरस, सत्यनारायण गव्हाणकर, खुशाल परतवाघ, देवानंद जोशी, प्रकाश लव्हाळे, प्रभाकर लंगोटे, संतोष मुंडे, पप्पू मात्रे, सदानंद पेकम आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.