शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 20:14 IST

भाजपा सत्तेतून बाहेर होऊ शकते

ठळक मुद्देराजकीय चर्चा सुरु

परभणी : राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेसची महाशिवआघाडी सत्तेत येण्याची चिन्हे असतानाच जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडीचा प्रयोग होऊ शकतो, अशीच चर्चा राजकीय वर्तूळातून सुरु झाली आहे. तसेच १९ नोव्हेंबर रोजी जि.प. अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३,  काँग्रेसचे ६, भाजपाचे ५, रासपचे ३ व तीन अपक्ष सदस्य आहेत. जि.प.त राष्ट्रवादीची सत्ता असून भाजपा सत्तेत सहभागी झाला आहे. २०१४ मध्ये राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात राज्यस्तरावरुन निधी आणण्यासाठी मदत होईल, या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीने भाजपाला सत्तेत सहभागी करुन घेतले होते. यामागे त्यावेळी काँग्रेसचा विरोधही कारणीभूत होता; परंतु, गेल्या अडीच वर्षात भाजपाचा राष्ट्रवादीला निधी आणण्यासाठी काडीचाही फायदा झाला नाही. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीतील दुरावा कमी झाला आणि या समविचारी पक्षांची मैत्री विधानसभा निवडणुकीपूर्वी घट्ट झाली. सहाजिकच त्याचे पडसाद आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये उमटणार आहेत.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाशिवआघाडीचे सरकार सत्तेत येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडी तयार होऊ शकते. हे तीन पक्ष एकत्र आल्यास राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३ आणि काँग्रेसचे ६ असे ४३ सदस्यांचे तगडे संख्याबळ जि.प.होईल. त्यामुळे राज्यस्तरावरुन विकासकामांसाठी निधी आणणे सोपे होईल. शिवात सत्तेतील समान कार्यक्रम राबविताना अडचणी येणार नाहीत, अशी  चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे. विशेष म्हणजे हे तीन पक्ष एकत्र आल्यास जिल्हा परिषदेत विरोधकच नसल्यागत स्थिती राहणार आहे. विरोधी पक्षनेतेपद संख्याबळानुसार भाजपाकडे जावू शकते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, माजी आ.विजय भांबळे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश वरपूडकर यांच्यात चांगला समन्वय निर्माण झाला आहे.  

शिवसेनेचा एक गटही जिल्हा परिषदेत सत्तेत येऊ इच्छितो. त्या दृष्टीकोनातून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढेही भरविले होते. त्यामुळे महाशिवआघाडीसाठी जि.प.त पोषक वातावरण असल्याची चर्चा आहे. शिवसेना जि.प.तील सत्तेत सहभागी झाल्यास भाजपाला दिलेले सभापतीपद सेनेला मिळू शकते. शिवाय स्थायी समितीतील सदस्य संख्याही सेनेची वाढू शकते. या सर्व शक्यता असल्या तरी ऐनवेळी काही शिवसेना व राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांमधील वाद न मिटल्यास महाशिवआघाडीसाठी अडचणीही येऊ शकतात. अशा वेळी राज्यस्तरीय नेत्यांचा हस्तक्षेपही या माध्यमातून होईल, असेही राजकीय जाणकारांचे मत आहे. 

टॅग्स :Parbhani z pपरभणी जिल्हा परिषदBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस