शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणीत राष्ट्रवादीला फटका; महायुतीला झाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 18:53 IST

शिवसेनेने परभणीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे़

- अभिमन्यू कांबळे

शिवसेनेने परभणीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे़ सलग सातव्यांदा या मतदारसंघातून शिवसेनेने निर्विवाद विजय संपादन केल्याने विरोधातील सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे़ येथे शिवसेनेला मित्रपक्षांची भक्कम साथ मिळाली़ त्यामुळे आ़ डॉ़ राहुल पाटील यांचा विजय सुकर झाला़ त्यांनी तब्बल ८१ हजार ७९० विक्रमी मतांनी एमआयएमचा पराभव केला़ 

पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची एकही सभा झाली नसताना सुरेश वरपुडकर यांनी भाजपचे मोहन फड यांचा १४ हजार ७७४  मतांनी पराभव केला़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी ताकदीने वरपुडकर यांना साथ दिली़ शिवाय ४० वर्षांचा राजकीय अनुभव पणाला लावत वरपुडकर यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा फळाला आली़ जिंतूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना स्वपक्षीयातील नाराजी भोवली़ शिवाय भाजप नेत्यांनी मेघना बोर्डीकर यांच्यासाठी ताकदीने प्रचार केला़ परतूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघना  यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते़ त्यांचा येथे भाजपला फायदा झाला़ त्यामुळे बोर्डीकर यांनी भांबळे यांचा ३ हजार ७१९ मतांनी पराभव केला़ गंगाखेड  मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी चमत्कार करीत तुरुंगात असताना शिवसेनेचे विशाल कदम यांचा १८ हजार १५८ मतांनी पराभव केला़ येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आ़ मधुसूदन केंद्रे सहाव्या क्रमांकावर फेकले गेले़ 

ठळक मुद्दे : 1. राष्ट्रवादीच्या ताब्यातील गंगाखेड व जिंतूर विधानसभा मतदारसंघावर अनुक्रमे रासप व भाजपने कब्जा केला आहे़ 2. शेतकरी कर्ज फसवणूक प्रकरणात तुरुंगात असतानाही रासपकडून निवडणूक लढवत रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळविला़  3. जिल्ह्याच्या राजकारणात ४० वर्षांपासून सक्रिय असलेले सुरेश वरपुडकर- रामप्रसाद बोर्डीकर ही जोडगोळी पाच वर्षानंतर सक्रिय़ 4. १९९० ते २०१९ अशा २९ वर्षातील सात निवडणुकांत परभणीत शिवसेनेने सलगपणे विजय मिळविला आहे़  5. आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथरीत सभा घेऊनही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले़ 

पक्षनिहाय विजयी उमेदवार : भाजप1. मेघना बोर्डीकर, जिंतूरशिवसेना1. राहुल पाटील, परभणीकाँग्रेस1. सुरेश वरपूडकर, पाथरीरासपा1. रत्नाकर गुट्टे, गंगाखेड

मेघनांची भांबळेंवर मात जिंतूरच्या राजकारणात १५ वर्षांपासून भांबळे-बोर्डीकर यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे़ २०१४ मधील वडील रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पराभवाचा वचपा काढत मेघना बोर्डीकर यांनी विजय भांबळे यांचा पराभव केला़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना