सरपंचपदी मधुरा शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST2021-02-15T04:15:56+5:302021-02-15T04:15:56+5:30
पिंगळी : परभणी तालुक्यातील परळगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधुरा मोतीराम शिंदे तर उपसरपंचपदी मुक्ताबाई प्रभाकर शिंदे यांची निवड झाली आहे. ...

सरपंचपदी मधुरा शिंदे
पिंगळी : परभणी तालुक्यातील परळगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधुरा मोतीराम शिंदे तर उपसरपंचपदी मुक्ताबाई प्रभाकर शिंदे यांची निवड झाली आहे. परळगव्हाण ग्रामपंचायतीत झालेल्या निवडणुकीत स्व. शंकरराव शिंदे प्रणित जय किसान नवयुवक पॅनलने विजय मिळवला. एकूण ७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत जय किसान नवयुवक पॅनलने चार जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत पॅनलच्या मधुरा मोतीराम शिंदे यांची सरपंचपदी तर मुक्ताबाई प्रभाकर शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी राजेश कांबळे, वत्सलाबाई विठ्ठल जावळे या सदस्यांसह विस्तार अधिकारी ए. एस. सारुक, ग्रामसेवक प्रमोद शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस जमादार एच. एस. मरगळ, कर्मचारी संतोष बेद्रे यांनी यावेळी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता.