म. फुले यांना ठिकठिकाणी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:18+5:302021-04-13T04:16:18+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हाधिकारी कार्यालयात थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दीपक ...

M. Greetings to Phule | म. फुले यांना ठिकठिकाणी अभिवादन

म. फुले यांना ठिकठिकाणी अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालय

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी म. फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, लक्ष्मण पिचारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका कार्यालय

महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जाेतिबा फुले यांची जयंतीनिमित्त म. फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर अनिता सोनकांबळे, आ. सुरेश वरपूडकर, आ. डॉ. राहुल पाटील, उपमहापौर भगवान वाघमारे, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, विजय वाकोडे आदी उपस्थित होते. मनपा कार्यालयात म. फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त देविदास पवार, उपायुक्त प्रदीप जगताप, नगरसचिव विकास रत्नपारखे, रामेश्वर कुलकर्णी, उमेश जाधव, गजानन जाधव, रंगनाथ गरुड आदींची उपस्थिती होती.

लहुजी साळवे कर्मचारी महासंघ

येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश उफाडे, कमलेश क्षीरसागर, रोहिदास नेटके, मारोती कदम आदींची उपस्थिती होती.

म. फुले युवक समता परिषद

अ.भा. महात्मा फुले युवक समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल गोरे, भाऊसाहेब गोरे, रामचंद्र दुधारे, गीता गोरे, मेघा दुधारे, आराध्या गोरे, नीता गोरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: M. Greetings to Phule