'श्री लक्ष्मी नृसिंह'ची ३० हजार क्विंटल साखर भिजून लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:45+5:302021-05-30T04:15:45+5:30
परभणी : तालुक्यातील अमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याच्या गोदामावरील शंभरहून अधिक पत्रे उडाल्याने सुमारे ३० हजार ...

'श्री लक्ष्मी नृसिंह'ची ३० हजार क्विंटल साखर भिजून लाखोंचे नुकसान
परभणी : तालुक्यातील अमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याच्या गोदामावरील शंभरहून अधिक पत्रे उडाल्याने सुमारे ३० हजार क्विंटल साखर भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास परभणी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणांची झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्याचा तडाखा अमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याला बसला आहे. या वर्षीच्या हंगामात कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर याच परिसरात गोदामात साठवून ठेवली होती. वादळी वाऱ्यामुळे गोदामावरील पत्रे उडाल्याने सुमारे ३० हजार क्विंटल साखर भिजून नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ताडपत्री पांघरून ठेवलेले साखर पोतेही भिजले आहेत. कारखान्याची मुख्य इमारत, कर्मचारी वसाहत, केन यार्ड, नंबर टेकर रूम या ठिकाणचीही पत्रे उडाली. तसेच असवानी प्रकल्पासाठी साठवून ठेवलेले सिमेंटचे पोते पावसाने भिजले असून, वादळी वाऱ्यात कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक सुशील पाटील यांनी दिली.