ढालेगाव चेकपोस्टवर तपासणीला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:52+5:302021-03-26T04:17:52+5:30
पाथरी : जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहनांच्या आवगनावर बंदी असताना परभणी-बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या ढालेगाव चेकपोस्ट नाक्यावर वाहनधारकांची बिनदिक्कत ये-जा ...

ढालेगाव चेकपोस्टवर तपासणीला खो
पाथरी : जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहनांच्या आवगनावर बंदी असताना परभणी-बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या ढालेगाव चेकपोस्ट नाक्यावर वाहनधारकांची बिनदिक्कत ये-जा सुरू असल्याची बाब गुरुवारी दुपारी १२ च्या सुमाररास प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर आली. विशेष म्हणजे येथील नियुक्त कर्मचारी एका बाजुला बसून होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १ एप्रिलपर्यंत परभणी जिल्ह्यातून जाण्यास व जिल्ह्यात येण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावला आहे. या अनुषंगाने तहसीलदार श्रीकांत निळे यांनी जिल्हा हद्दीवर पथकांची नियुक्ती केली आहे. २५ मार्चपासून ढालेगाव येथील चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे रस्त्यावर बॅरीकेटस् लावण्यात आले असून, एक टेंट उभारण्यात आला आहे. या अनुषंगाने ढालेगाव येथील चेकपोस्ट नाक्याला गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास भेट दिली असता, येथील नाक्यावर नियुक्त केलेल्या पथकातील दोन शिक्षक, एक आरोग्य कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी एका बाजुला बसल्याचे पहावयास मिळाले. बीड जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणारी व जाणारी वाहने बिनदिक्कतपणे ये-जा करीत होती. येथे तपासणी करण्याचे आदेश असतानाही एकही वाहन थांबविले जात नव्हते. त्यामुळे तपासणी नाका नावालाच आहे की काय? असा सवाल उपस्थित होत होता.
सातोना, देवगावफाटा येथेही बिनदिक्कत ये-जा
सेलू तालुक्यातील जालना जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या सातोना फाटा व देवगावफाटा येथील चेकपोस्टवरही ढालेगावसारखीच परिस्थिती पहावयस िमळाली. येथे तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून सर्व वाहने तपासणी जात नाहीत. एखाद-दोन वाहने तपासून अधिकारी बाजुला बसत असल्याचे चित्र गुरुवारी पहावयास मिळाले. त्यामुळे हे तपासणी नाके नाममात्र ठरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या लक्ष घालून या नाक्यावर कडक तपासणी करण्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे.