घरात घुसून चाकूच्या धाकावर व्यापा-याचे दीड लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 17:10 IST2017-08-29T17:10:18+5:302017-08-29T17:10:31+5:30

तोंडाला रुमाल बांधून घरात घुसलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका व्यापा-याचे दीड लाख रुपये पळवून नेल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास बोरी येथे घडली. 

Looted one and a half million rupees of a knife in the house | घरात घुसून चाकूच्या धाकावर व्यापा-याचे दीड लाख लुटले

घरात घुसून चाकूच्या धाकावर व्यापा-याचे दीड लाख लुटले

परभणी, दि. २९  : तोंडाला रुमाल बांधून घरात घुसलेल्या तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका व्यापा-याचे दीड लाख रुपये पळवून नेल्याची घटना २८ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास बोरी येथे घडली. 

बोरी येथे  सोमाणी कॉलनीतील रहिवासी गणेशलाल शंकरलाल सोमाणी यांचे राम मंदिर रस्त्यावर किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करुन गल्ल्यातील पैसे एका पिशवीत टाकून सोमाणी हे घरी आले. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जेवण करीत असताना तोंडाला रुमाल बांधलेले तीन चोरटे त्यांच्या घरात घुसले. गल्ल्यातील पैसे कुठे ठेवलेस? अशी विचारणा करीत चोरट्यांनी सोमाणी यांच्या गळ्याला चाकू लावला. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी घरात होती. या प्रकारामुळे सोमाणी कुटुंबिय घाबरुन गेले. त्यानंतर गणेशलाल हे पैसे आणतो म्हणून आतील खोलीत गेले. त्यावेळी एक चोरटाही आत आला त्याने हे सर्व पैसे एका गाठोड्यात टाकले.

त्यानंतर तिनही चोरटे पळून गेले. या घटनेनंतर सोमाणी यांनी बाहेर येऊन आरडा-ओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक जमा झाले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. मात्र श्वान जागेवरच घुटमळला. 
 

Web Title: Looted one and a half million rupees of a knife in the house