शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

परभणी तालुका क्रीडांगणांसाठी मिळेना जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:57 PM

तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील क्रीडापटूंना सराव करण्यासाठी सुसज्ज क्रीडांगणाची उभारणी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात चार तालुक्यांमध्ये क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने कामे ठप्प आहेत़ तर जिंतूर येथे जागा उपलब्ध झाली असून, या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी आता प्रशासनाला वेगळे प्रयत्न करावे लागत आहेत़ एकंरित जिल्ह्याच्या क्रीडा विकासामध्ये जागेचा अडसर निर्माण झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील क्रीडापटूंना सराव करण्यासाठी सुसज्ज क्रीडांगणाची उभारणी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात चार तालुक्यांमध्ये क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने कामे ठप्प आहेत़ तर जिंतूर येथे जागा उपलब्ध झाली असून, या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी आता प्रशासनाला वेगळे प्रयत्न करावे लागत आहेत़ एकंरित जिल्ह्याच्या क्रीडा विकासामध्ये जागेचा अडसर निर्माण झाला आहे़जिल्ह्यातील खेळाडुंच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव काही वर्षापूर्वी मंजूर झाला आहे़ ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, या खेळाडूंना किमान भौतिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्यातील क्रीडा कौशल्य वृद्धींगत व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी क्रीडांगण उभारणीचे धोरण आखले आहे़ या धोरणानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी क्रीडांगण उभारणीला मंजुरी मिळाली़ परभणी तालुक्यासह इतर आठही तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय क्रीडांगण निर्मिती केली जाणार आहे़ मात्र जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणीसह पाथरी, सोनपेठ, मानवत या तालुक्यांमध्ये क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सरकारी जागांवर अतिक्रमण होत असताना क्रीडा संकुलासाठी मात्र जागा मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़सद्यस्थितीला उपलब्ध माहितीनुसार परभणी शहरामध्ये क्रीडा संकुलासाठी जागेचा शोध सुरू आहे़ शहरात जिल्हा क्रीडा संकुल उपलब्ध आहे़ परंतु, तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध नाही़ क्रीडा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने एक-दोन जागा शोधल्या़ परंतु, संकुलाच्या प्रमाणानुसार योग्य जागा मिळत नसल्याने तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला आहे़ अशीच परिस्थिती पाथरी, सोनपेठ, मानवत आणि गंगाखेड तालुक्यातही आहे़ जिंतूर तालुक्यामध्ये क्रीडा संकुलासाठी जागा मिळाली खरी़ मात्र या जागेवर अतिक्रमण आहे़ हे अतिक्रमण उठविण्याचे काम जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे़ त्यानंतरच या ठिकाणी क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला सुरुवात होईल़ जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी पूर्णा, सेलू या दोनच तालुक्यांत तालुका क्रीडा संकुलासाठी जागा मिळाली आहे़ पूर्णा तालुक्यातील क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे़ सेलू तालुक्यासाठी येत्या काही दिवसांत कामाला सुरुवात होईल़ तर पालम तालुक्यात क्रीडा संकुलासाठी जागा मिळाली असून, या जागेचे नाहरकत प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे़ एकंदर जिल्हाभरात केवळ एकाच ठिकाणी तालुका क्रीडा संकुल प्रत्यक्षात उभारणीचे काम सुरू झाले असून, बाकी इतर ठिकाणी मात्र जागेचा अडसर कायम आहे़ परिणामी क्रीडा विकासाला खीळ बसत आहे़क्रीडा सुविधांसाठी ३० कोटी रुपयांची मागणीच्परभणी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांच्या विकास कामांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे २९ कोटी ९० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे़ जिल्ह्यातील खेळाडू या क्रीडा संकुलाचा वापर करतात़ सध्या या संकुलात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा व प्रशिक्षणाचे आयोजनही केले जाते़ वर्षभर सराव आणि प्रशिक्षणासाठी क्रीडा संकुलाचा दर्जा उंचावणे गरजेचे आहे़च्त्यासाठीच विविध खेळांसाठी बंदिस्त मैदान, प्रेक्षक गॅलरी, सिंथेटीक फ्लोरीग, मॅट आदी कामांसाठी १० कोटी १५ लाख, स्केटींग रिंग प्रेक्षक गॅलरीसह ५ कोटी रुपये, सेलू येथील तालुका क्रीडा संकुलात विविध खेळासांठी बंदिस्त मैदान आणि जलतरण तलाव उभारणीसाठी ८ कोटी २५ लाख, पूर्णा येथील तालुका क्रीडा संकुलात विविध खेळांसाठी बंदिस्त मैदान उभारणीसाठी ३ कोटी २५ लाख आणि जिंतूर तालुका क्रीडा संकुलासाठी ३ कोटी २५ लाख असा २९ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे़च् या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना मिळू शकेल़ जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे़जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यामातून खेळाडुंचा विकास हे ध्येय समोर ठेवून कामे करण्याचा मानस आहे़ परंतु, अनेक वेळा शासकीय निधी कमी पडतो़ त्यामुळे सामाजिक संस्थांना सोबत घेऊन ही कामे करावी लागणार आहेत़ त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़ परभणी येथील टर्फ विकेट बनविण्यासाठी खासदार निधीतून २० लाख रुपये मंजूर झाले आहेत़ त्यामुळे टर्फ विकेट बनविण्यासंदर्भातही प्रक्रिया सुरू आहे़ लवकरच कामे केली जातील़-कलीमोद्दीन फारोकी, जिल्हा क्रीडा अधकिारी, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीEnchroachmentअतिक्रमण