विजांच्या कडकडाट, वादळी वारे अन पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST2021-05-29T04:14:52+5:302021-05-29T04:14:52+5:30
परभणी शहरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास वातावरणात बदल झाला. सकाळपासून कडक उन्हाचा अनुभव घेतलेल्या परभणीकरांना दुपारी झालेल्या पावसाने काहीसा ...

विजांच्या कडकडाट, वादळी वारे अन पाऊस
परभणी शहरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास वातावरणात बदल झाला. सकाळपासून कडक उन्हाचा अनुभव घेतलेल्या परभणीकरांना दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. विजेचा कडकडाट आणि त्यातच वारे सुटल्याने पावसात काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली. तीन ते चार वेळा जोरदार विजेचा कडकडाट झाल्याचे एकावयास मिळाले. एक तास झालेल्या पावसाने शहरातील काही भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर काही भागांमध्ये झाडे उन्मळून पडली. यामध्ये दादाराव प्लॉट परिसरातील काही झाडे वाऱ्याने रस्त्यावर आडवी पडली. जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या सुध्दा अनेक ठिकाणी उडून पडल्या. पडलेल्या झाडांना रस्त्यावरून हटवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. दरम्यान, गावठाण भागातील रस्त्यावर पाणी साचले होते. हा पाऊस एक तासाने बंद झाला. जिल्ह्यात अन्य ठिकाणी पाऊस झाला नाही मात्र, गंगाखेड, परभणी तालुक्यातील पोखर्णी येथे जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण झाल्याचे दिसून आले.