निसर्ग संपन्नतेमुळेच जीवन सुकर- टाकसाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:06+5:302021-06-06T04:14:06+5:30

शहरातील कारेगाव रोड भागातील गजानन नगर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड आणि वृक्ष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Life is easy because of the richness of nature | निसर्ग संपन्नतेमुळेच जीवन सुकर- टाकसाळे

निसर्ग संपन्नतेमुळेच जीवन सुकर- टाकसाळे

शहरातील कारेगाव रोड भागातील गजानन नगर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड आणि वृक्ष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकसाळे बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव,सामाजिक वनीकरण अधिकारी पी.सी. वाघचौरे, प्रा.डॉ. भीमराव खाडे,डॉ. प्रकाश डाके, डॉ.बी.टी.धुतमल, कृषी अधिकारी तथा आयोजक कैलास गायकवाड, कमलाकर मोरे,प्रा.टी.जी.सूर्यवंशी, आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना टाकसाळे म्हणाले की, झाडांच्या आजूबाजूला बांधकाम न करता त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या. पुढच्या पिढीला पैसा, इमारत,जमीन यापेक्षा सुंदर निसर्ग कामाला येणार आहे.त्यामुळे असे जीवन जगा की आपलं जगणं निसर्गाच्या कामाला आलं पाहिजे. यावेळे डॉ. खाडे म्हणाले की, व्यक्तीला पुरेल एवढा ऑक्सिजन कुठल्याच प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ तयार करू शकत नाहीत तर तो केवळ वृक्षच तयार करू शकतात. त्यामुळे पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर झाड लावले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ झोडपे तर आभार निवृत्ती रेखडगेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रकाश मेथेकर, उत्तमराव पवार, राजू घनसावंत, उत्तमराव सुतार, चव्हाण, मस्के, झोडपे, जाधव, शोबित नाईक, शुभम दुधाटे, तेजस फुलपगार, मुकेश मुळे, विश्वजीत गायकवाड़, अनिल येटेवाड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Life is easy because of the richness of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.