उशिराने मिळाल्या भूल देण्याच्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST2021-01-13T04:42:56+5:302021-01-13T04:42:56+5:30

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथील कुक्कुट पक्षी नष्ट करण्यासाठी लागणाऱ्या भूल देण्याच्या गोळ्या पशुसंवर्धन विभागाला मंगळवारी सायंकाळी उशिराने प्राप्त ...

Late anesthesia pills | उशिराने मिळाल्या भूल देण्याच्या गोळ्या

उशिराने मिळाल्या भूल देण्याच्या गोळ्या

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथील कुक्कुट पक्षी नष्ट करण्यासाठी लागणाऱ्या भूल देण्याच्या गोळ्या पशुसंवर्धन विभागाला मंगळवारी सायंकाळी उशिराने प्राप्त झाल्या. त्यामुळे मंगळवारीदेखील पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही. तालुक्यातील मुरुंबा येथे ८०० कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला मिळाला. त्यानंतर या भागातील कुुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्लूची झालेली लागण इतर भागात पसरू नये, यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुरुंबा परिसरातील १ कि.मी.च्या त्रिज्येतील कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने सोमवारी पक्षी नष्ट करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. मंगळवारी सकाळी या भागात जेसीबीने खड्डे तयार केले. पीपीई कीट कॅरिबॅग, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य जमा केेले. मात्र कुलिंग करावयाच्या पक्ष्यांना भूल देण्यासाठी लागणाऱ्या ‘सोडियम फिनो गोर्विन’ या टॅबलेट दिवसभर उपलब्ध झाल्या नाहीत. या टॅबलेट सायंकाळी साडेसहाच्यासुमारास उपलब्ध झाल्या. त्यामुळे आता या भागातील कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया बुधवारी केली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातून मिळाली.

Web Title: Late anesthesia pills