जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:02+5:302021-05-30T04:16:02+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरीत्या घटला असून, शनिवारी जिल्ह्यात ६७ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे; तर एका रुग्णाचा मृत्यू ...

जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत मोठी घट
परभणी : कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरीत्या घटला असून, शनिवारी जिल्ह्यात ६७ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे; तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संसर्ग घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी बाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आरोग्य विभागाला एक हजार ३२६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या एक हजार ५५ अहवालांमध्ये ५० आणि रॅपिड टेस्टच्या २७१ अहवालांमध्ये १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दुसरीकडे, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण घटले असून, शनिवारी खासगी रुग्णालयातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ४९ हजार ७८१ झाली असून, त्यांपैकी ४५ हजार ५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एक हजार २२४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या तीन हजार ५०१ रुग्ण उपचार घेत आहेत.
२८३ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील २८३ रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त झाले. या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.