आयसीयूमधून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST2021-09-08T04:23:13+5:302021-09-08T04:23:13+5:30

जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील अशोक रामराव अंभोरे यांची आई आजारी असल्याने त्यांनी त्यांना उपचारासाठी शहरातील बस स्थानक परिसरातील परतानी ...

Lampas with gold jewelry with cash from ICU | आयसीयूमधून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

आयसीयूमधून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील अशोक रामराव अंभोरे यांची आई आजारी असल्याने त्यांनी त्यांना उपचारासाठी शहरातील बस स्थानक परिसरातील परतानी हॉस्पिटल येथे २ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल केले होते. येथील आयसीयूमधील बेड क्रमांक ५ वर अंभोरे यांच्या आई उपचार घेत असताना, त्यांच्या बेडच्या बाजूला अंभोरे यांच्या सविता व संगीता या दोन बहिणी झोपल्या होत्या, तर अशोक अंभोरे हे बाहेर ओपीडीमध्ये झोपले होते. आईच्या उपचारासाठी त्यांनी भावाकडून घेतलेले ५५ हजार रुपये व सोन्याचे दागिने ठेवले होते. सदरील पैशांची बॅग त्यांच्या बहिणीजवळ ठेवली होती. आयसी वॉर्डमध्ये ६ रुग्ण व त्यांचे नातेवाईक होते. रोख रक्कम व सोन्याचे दागिने असलेल्या बॅगेतून पैसे व रोख रक्कम चोरीस गेल्याची बाब सकाळी ५च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अशोक अंभोरे यांनी ६ सप्टेंबर रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Lampas with gold jewelry with cash from ICU