भौतिक सुविधांचा अभाव

By Admin | Updated: December 22, 2014 15:07 IST2014-12-22T15:07:41+5:302014-12-22T15:07:41+5:30

विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा परिणाम करणार्‍या भौतिक सुविधा बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध नसल्याचे २0१३-१४ च्या यू-डायसवरुन समोर आले आहे.

Lack of physical facilities | भौतिक सुविधांचा अभाव

भौतिक सुविधांचा अभाव

आकडेवारी सादर करण्यात शाळांची उदासीनता

परभणी : विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा परिणाम करणार्‍या भौतिक सुविधा बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध नसल्याचे २0१३-१४ च्या यू-डायसवरुन समोर आले आहे. 
विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा बुद्धिमत्तेवरही परिणाम पडतो. शाळेच्या परिसराचाही त्यामध्ये समावेश असतो. हे घटकच बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. शाळा इमारत, मुख्याध्यापकाचे कक्ष, वर्ग खोल्या, शौचालय, पाणी, पाकगृह, संरक्षक भिंत आदी सुविधा जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील १ हजार १२४शाळांपैकी काही शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. गंगाखेड तालुक्यात १५८शाळा आहेत. या शाळांपैकी पाच शाळेला इमारत नाही, १0२ शाळांना मुख्याध्यापक नाही, १८ शाळांतील अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प नाहीत तर एका शाळेला शौचालय नाही. ८0 शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही. २२शाळांमध्ये पाकगृह नाही. तर १00 शाळांना संरक्षक भिंत नाही. हीच स्थिती विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ८0 शाळांमध्ये मैदान नाही. 
जिंतूर तालुक्यातील २१९ शाळांपैकी १६३ शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष नाही. ४५ शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना रॅम्प नाही. ४0 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शौचालय उपलब्ध नाही तर ५0 शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही. २७ शाळांमध्ये किचनशेड नाही. ११७ शाळांना संरक्षक भिंत नाही. तर १00 पेक्षा जास्त शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही. मानवत तालुक्यातील ७१शाळांपैकी २३शाळांमध्ये मुख्याध्यापकांना बसण्यासाठी कक्ष नाही तर १६ शाळांमध्ये रॅम्प नाही. तर एका शाळेला किचन शेड, २३शाळांना संरक्षक भिंत नाही. २२शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही. पालम तालुक्यातील १0६ शाळांपैकी पाच शाळांना किचनशेड तर ५0पेक्षा जास्त शाळांना संरक्षक भिंत नाही. परभणी तालुक्यातील १५४ शाळांपैकी तीन शाळांना इमारत नसून ९६शाळांना मुख्याध्यापक कक्ष, १६ शाळांना रॅम्प, १0 शाळांमध्ये शौचालय नाही. पिण्याचे पाणी २७ शाळांमध्ये उपलब्ध नाही. २१शाळांमध्ये किचनशेड नाहीत. ९३शाळांना संरक्षक भिंत नाही. तर ९५ शाळांना मैदान उपलब्ध नाही. 
पाथरी तालुक्यातील १0१ शाळांपैकी ६0शाळांना मुख्याध्यापक कक्ष, २२शाळांमध्ये रॅम्प, ११ शाळांमध्ये पिण्याचे पाणी तर ६0शाळांना संरक्षक भिंत नाही. हीच स्थिती क्रीडांगणाची आहे. पूर्णा तालुक्यातील ११३ शाळांपैकी ६८शाळांत मुख्याध्यापक कक्ष नाही. २0 शाळांमध्ये संरक्षक भिंत नाही. सेलू तालुक्यातील ११३शाळांपैकी ६५ शाळांना संरक्षक भिंत व मैदान नाही. सोनपेठ तालुक्यातील ८९ शाळांपैकी ३९ शाळांना मुख्याध्यापक कक्ष नाही. तर ४0 शाळांमध्ये ६0शाळांना संरक्षण भिंत नाही. 
एकीकडे ग्रामीण भागातील शैक्षिणक सुविधा पुरविण्यावर शासन भर देत आहे. मोफत व सक्तीचे शिक्षण देत असताना मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता ज्या बाह्य वातावरणावर अवलंबून आहे. तीच साधने विद्यार्थ्यांना पोहोचलेली नाहीत.

 ■ २0१३-१४ च्या यू-डायसनुसार ही आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात मात्र यापेक्षा स्थिती वेगळी आहे. काही शाळांची २0१४-१५ ची आकडेवारी अद्याप जमा झाली नाही वा शाळेने जमा करण्याची तसदीही घेतली नाही. भौतिक सुविधांचा एकत्रित आढावा शिक्षण विभागाने सादर करीत असताना प्रत्यक्षात सुविधा नसतानाही उपलब्ध असल्याचे दाखविण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत.

Web Title: Lack of physical facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.