कुंजबिहारी हॉटेलला सील

By Admin | Updated: January 30, 2015 14:44 IST2015-01-30T14:44:56+5:302015-01-30T14:44:56+5:30

स्टेशनरोड परिसरातील कुंजबिहारी हॉटेलला २९ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या एका संयुक्त कारवाईत सील ठोकण्यात आले. शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात कुंजबिहारी हॉटेल आहे.

Kunj Bihari Hotel Seal | कुंजबिहारी हॉटेलला सील

कुंजबिहारी हॉटेलला सील

परभणी : स्टेशनरोड परिसरातील कुंजबिहारी हॉटेलला २९ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या एका संयुक्त कारवाईत सील ठोकण्यात आले. 
शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात कुंजबिहारी हॉटेल आहे. या हॉटेलमधील अन्न नमुने तसेच परवान्यांसंदर्भात तपासणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाचे पथक दाखल झाले. पोलिस कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तासाठी हे पथक हॉटेलमध्ये तपासणी करीत असल्याने नेमकी काय कारवाई आहे, या संदर्भात परिसरात तर्क-वितर्क लढविण्यात येत होते. कारवाई दरम्यान परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने हॉटेलमधील अन्न नमुने, स्वच्छता, पाण्याची तपासणी आदी विषयीची पाहणी करण्यात आली. त्याच प्रमाणे तहसील कार्यालयाच्या पथकाने हॉटेल व्यवसायाचा परवाना, अन्न परवाना आदी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात किती परवान्यांचे नुतनीकरणाचीही माहिती पथकाने घेतली. महानगरपालिकेच्या वतीनेही या मोहिमेत सहभाग घेण्यात आला. दरम्यान, कुंजबिहारी हॉटेल, लॉजिंग व कुंजबिहारी स्नॅक्स असे प्रतिष्ठान या ठिकाणी आहे.दुपारी १२ वाजेच्या सुमारास या कारवाईला प्रारंभ झाला. दोन ते अडीच तासांच्या कारवाईनंतर अडीच वाजेच्या सुमारास कुंजबिहारी हॉटेल आणि कुंजबिहारी स्नॅक्स या दोन्ही प्रतिष्ठांना सील ठोकण्यात आले. 
उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार संतोष रुईकर, मंडळ अधिकारी जीवन कुलकर्णी, शेख वसीम हे महसूलचे कर्मचारी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्न निरीक्षक सुनील जिंतूरकर, आर. डी. कोकडवार, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रकाश कुलकर्णी, सय्यद इम्रान, प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, राजू झोडपे आदींनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्यासह नवा मोंढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लांडगे, पोलिस उपनिरीक्षक कापुरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. /(प्रतिनिधी) 

जिल्हाधिकारी कार्यालयातून हॉटेल व्यवसायासाठी खाद्य परवाना दिला जातो. कुंजबिहारी हॉटेलच्या मालकाकडे खाद्य परवाना उपलब्ध होता. परंतु, १९९८ पासून परवान्याचे नुतनीकरण नव्हते. तसेच या हॉटेलच्या शेजारीच असलेल्या कुंजबिहारी स्नॅक्स यांच्याकडे कुठलाही परवाना नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या सूचनेनुसार सील ठोकल्याची माहिती तहसीलदार संतोष रुईकर यांनी दिली. 

 

Web Title: Kunj Bihari Hotel Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.