गुडघे, खुबेरोपण शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:33+5:302021-02-05T06:07:33+5:30
खुबेरोपण व मूत्रविकाररोग निदान व उपचार शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला . या शिबिरात खुबेरोपण तज्ज्ञ डॉ. सुनील सोनार, ...

गुडघे, खुबेरोपण शिबिरास प्रतिसाद
खुबेरोपण व मूत्रविकाररोग निदान व उपचार शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला .
या शिबिरात खुबेरोपण तज्ज्ञ डॉ. सुनील सोनार, गुडघा व कोपर सांधे रोपण तज्ज्ञ डॉ. अभितेज म्हस्के, मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. अजिंक्य पाटील यांनी एकूण १६४ रुग्णांची तपासणी केली. यावेळी गरजू रुग्णांवर उपचार तसेच मूत्रविकाराच्या रुग्णांवर शास्त्रक्रियाही करण्यात आल्या.
सांधेदुखी, गुडघेदुखी होण्याची बरीच कारणे आहेत. अनेकदा गुडघा, पाय यांच्या शिरा खराब झालेल्या असतात,
हाडांच्या दोन टोकांना जोडणारा भाग खराब झालेला असतो, फ्रॅक्चरमुळे हाडांना इजा झालेली असल्यास रुग्णाला सांधेरोपण
शस्त्रक्रिया सुचवली जाते. यामध्ये खराब झालेले सांधे / अवयव बदलून त्या जागी धातू, प्लास्टिक आणि सिरॅमिकचे अवयव
प्रॉस्थेसीस बसवले जातात. प्रॉस्थेसीस शरीराची हालचाल सुलभपणे होण्यासाठी वापरले जातात. घोटा, मनगट, खांदा आदी
भागांसाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.
मूत्ररोग शिबिरामध्ये मूतखडा, प्रोस्टेट संबंधी आजार, सतत लघवी लागणे, लघवीसाठी जोर
करावा लागणे, ओटी पोटात दुखणे, लघवीची धार कमी होणे, लघवीवाटे रक्त जाणे, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग, लहान मुलांमधील
मूत्रविकार, स्त्रियांमधील मूत्रविकार इत्यादी रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.
शिबिर यशस्वीतेसाठी रुग्णालयाच्या डॉ. रेणू पांडे, डॉ. संध्या राठोड, डॉ. विनोदकुमार आदींच्या टीमने परिश्रम घेतले.
परभणी जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी यापुढेही अशी शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रफुल्ल पाटील तसेच संचालिका डॉ. विद्याताई प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.