परभणी : दूध दरवाढीसाठी किसान सभेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:30 IST2018-05-04T00:29:32+5:302018-05-04T00:30:20+5:30

दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले़

Kisan Sabha movement for milk price hike | परभणी : दूध दरवाढीसाठी किसान सभेचे आंदोलन

परभणी : दूध दरवाढीसाठी किसान सभेचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले़
दूध खरेदी केंद्रावर होणारी लूट थांबवून शेतकऱ्यांना आठ दिवसांत मोबदला रोखीने अदा करावा, सर्व दूध उत्पादकांना कृषी विभागामार्फत पुरेशा प्रमाणात सकस चारा बियाणे, बेने लागवडीसाठीच्या सर्व निविष्टा पुरविण्यात याव्यात, बाजारातील दर व शासकीय दरातील फरक भावांतर योजनेमार्फत शेतकºयांच्या खात्यावर सरकारने रक्कम जमा करावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यंमंत्र्यांना देण्यात आले़ यावेळी कॉ़ विलास बाबर, कॉ़ लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, राजेभाऊ राठोड, सुरेश काळदाते, भगवान टेकाळे, लक्ष्मण पुरणवाड, हनुमान मोगले, प्रल्हाद भरोसे, अशोक मोगले, भगवान खुपसे, कैलास बिटकर, शिवाजी पांचाळ, मुक्तीराम बोचरे, शेख अब्दुल, कॉ़ राजेभाऊ राठोड, कॉ़ अशोक कांबळे, कॉ़ भीमराव मोगल, उद्धव ढगे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Kisan Sabha movement for milk price hike