किडणी प्रत्यारोपणासाठी गाठावे लागते मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:19+5:302021-02-06T04:29:19+5:30
अद्ययावत डालेसीस युनिट अद्यावत असे डायलेसीस युनिट येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहे. या युनिटमुळे अनेक रुग्णांचे आयुष्यमान वाढण्यास ...

किडणी प्रत्यारोपणासाठी गाठावे लागते मुंबई
अद्ययावत डालेसीस युनिट
अद्यावत असे डायलेसीस युनिट येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहे. या युनिटमुळे अनेक रुग्णांचे आयुष्यमान वाढण्यास मदत झाली आहे. किडणीच्या आजाराच्या रुग्णांना प्रत्येक महिन्याला डायलेसीस करावे लागते. त्यामुळे या डायलेसीस युनिटमध्ये नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. महिन्यातून एक वेळा किंवा दोन वेळा डायलेसीस करुन घेणाऱ्या रुग़्णांना येथील डायलेसीस युनिट वरदान ठरले आहे.
नेत्र, अववयदान चळवळ
मागच्या काही वर्षांपासून अवयव दानाची चळवळ जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यातून वर्षभरात दोन ते तीन जणांचे अवयव दान नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केले जाते. त्याचबरोबर नेत्र दानाची चळवळही जिल्ह्यात आता बऱ्यापैकी रुजली आहे. मृत्यूनंतर नेत्रदान केले जाते. दरवर्षी ६० ते ७० नेत्रदान जिल्ह्यात होत आहेत. जालना येथील नेत्र रुग्णालयात हे नेत्रदान केले जाते. मात्र किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया परभणी येथे होत नसल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे यांनी दिली.