पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:17 IST2021-05-10T04:17:13+5:302021-05-10T04:17:13+5:30
जायकवाडी परिसरात पत्नी, दोन, मुली, एका मुलासह राहत असलेले विठ्ठल रामराव डुबुकवाड (वय ४६) हे ८ मे रोजी सकाळी ...

पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण
जायकवाडी परिसरात पत्नी, दोन, मुली, एका मुलासह राहत असलेले विठ्ठल रामराव डुबुकवाड (वय ४६) हे ८ मे रोजी सकाळी ११ वाजता अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहात पत्नीचा डबा घेऊन गेले असता सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घराबाहेर गेलेला त्यांचा मुलगा संग्राम विठ्ठल डुबुकवाड (वय १५) हा सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर तो मिळून आला नसल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला कशाचे तरी आमिष दाखवून त्यास पळवून नेत त्याचे अपहरण केल्याची फिर्याद ९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता विठ्ठल डुबुकवाड यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार मारोती माहोरे करीत आहेत.