गंगाखेड येथे कारगील विजय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST2021-07-28T04:18:29+5:302021-07-28T04:18:29+5:30
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमास तहसीलदार स्वरूप कंकाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य किशनराव भोसले, ह.भ.प. निवृत्तीनाथ ...

गंगाखेड येथे कारगील विजय दिन साजरा
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमास तहसीलदार स्वरूप कंकाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य किशनराव भोसले, ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज ईसादकर, गोविंद यादव, विष्णू मुरकुटे, राजेश फड, विठ्ठलराव रबदडे, तुकाराम तांदळे, सुशांत चौधरी, बाळासाहेब राखे, ॲड. व्यंकटराव तांदळे, लक्ष्मणराव लटपटे, अतुल गंजेवार, मेजर यशवंत मुंडे, बाबूराव पवार, श्रीकांत भोसले, बालासाहेब पारवे, मुशर्रफ खान, धोंडीराम जाधव, आर. डी. भोसले, गोविंद शेंडगे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात तालुक्यातील शहीद जवान महादू क्षीरसागर, जनार्दन मुंडे, ज्ञानोबा कराड, प्रवीण गायकवाड, शुभम मुस्तापुरे यांच्या कुटुंबातील आईवडिलांचा तसेच युद्धात सहभागी माजी सैनिकांचा व कोरोनाकाळात सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. पाण्यात बुडत असलेल्या सवंगडी मित्राला वाचविल्याने राष्ट्रपती पदकासाठी निवड झालेल्या ईसाद येथील नऊवर्षीय कृष्णा सातपुते या मुलासह कोरोना काळात नागरिकांना मोफत ५५ हजार मास्क वाटणाऱ्या मास्कमॅन गोविंद शेंडगे यांचाही सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार विश्वनाथ सातपुते यांच्यासह आजी-माजी सैनिकांनी परिश्रम घेतले.