परभणीत जीपने दुचाकीस्वाराला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:03 IST2017-12-24T00:03:40+5:302017-12-24T00:03:46+5:30
परभणी बसस्थानकाकडे येणाºया जीपचे स्टेअरिंग निखळले़ यामुळे ही जीप समोर असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली़ या घटनेत दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़

परभणीत जीपने दुचाकीस्वाराला उडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी बसस्थानकाकडे येणाºया जीपचे स्टेअरिंग निखळले़ यामुळे ही जीप समोर असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली़ या घटनेत दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़
परभणी बसस्थानकाकडे येणाºया क्रुझर जीपचे शहरातील उड्डाणपुलावर स्टेअरिंगसह दोन्ही चाके अचानक निखळले़ त्यामुळे या जीपच्या चालकाचा ताबा सुटला़ त्यामुळे ही जीप उड्डाणपुलावरील दुभाजकावर आदळली़ याचवेळी बसस्थानकाकडून येणाºया दुचाकीलाही जीपचा धक्का लागला़ या घटनेत जुना पेडगाव रोडवरील बालाजीनगरात राहणारे एफ़ए़ सिद्दीकी यांना मार लागला़
यावेळी नागरिकांनी दुचाकीवरील सिद्दीकी यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ दरम्यान, जीप चालक मात्र घटनास्थळावरुन फरार झाला़ अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती़