२ लाख 23 हजार नागरिकांच्या तपासण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST2021-04-23T04:19:08+5:302021-04-23T04:19:08+5:30
जिल्ह्यात ३९३ खाटा रिक्त परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांसाठी खाटा शिल्लक राहत नाहीत. ...

२ लाख 23 हजार नागरिकांच्या तपासण्या
जिल्ह्यात ३९३ खाटा रिक्त
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांसाठी खाटा शिल्लक राहत नाहीत. गुरुवारी केवळ ३९३ खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्हा रुग्णालयात १, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ५२, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २०, रेणुका कोविड हॉस्पिटल १८२ आणि अक्षदा मंगल कार्यालय २१ खाटा रिक्त आहेत.
१०२३ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १ हजार २३ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. महानगरपालिका रुग्णालयात २२३, जिल्हा रुग्णालयात १९४, अस्थिव्यंग शासकीय रुग्णालयात १३, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात १०९, प्राथमिक आरोग्य केंद्रात ८४, पालम तालुक्यात ४८, पूर्णा तालुक्यात ४२, सोनपेठ १३६, पाथरी ६८, सेलू ८२ आणि मानवत तालुक्यात २६ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत.