शहरं
Join us  
Trending Stories
1
"धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या गाडीवर कर्जमाफीसाठी शाई फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:00 IST

गंगाखेडात घडला प्रकार; पोलिसांची कमालीची गोपनीयता

गंगाखेड (जि. परभणी) : परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर या जनता दरबाराच्या निमित्ताने शहरात आल्या असता ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३५ वाजता कार्यक्रम स्थळी प्रवेशद्वारावर शासकीय वाहनावर दोघांनी शाईफेक केली. कर्जमुक्तीची फसवी घोषणा, अतिवृष्टी अनुदान मिळण्यास विलंब व पीकविमा न मिळाल्याच्या रोषातून हे कृत्य करणाऱ्या दोघांना क्षणात पोलिसांनी ताब्यात घेत घडलेल्या घटनेविषयी गोपनीयता पाळली. शुक्रवारी सायंकाळी संबंधित दोघांना जेवण्यासाठी पोलिसांनी सोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पालकमंत्री मेघना बोर्डीकर या गंगाखेड शहरात गुरुवारी परळी रोड येथे जनता दरबार कार्यक्रमासाठी जात होत्या. दरम्यान, या कार्यक्रमाच्या स्थळी प्रवेश करत असताना गाडी नंबर एचआर ९८ डब्ल्यू ३४५६ या शासकीय वाहनावर योगेश भगवानराव फड (वय ३८, रा. खादगाव ह. मु. संत जनाबाई नगर, गंगाखेड) व दीपक शिवराम फड (वय ३५, रा. खादगाव) या दोघांनी राज्य सरकार शेतकऱ्यांवर करत असलेल्या अन्यायाच्या संतापातून शाईफेक केली. गंगाखेड पोलिसांनी दोघांनाही क्षणार्धात ताब्यात घेतले असून, शुक्रवार सायंकाळपर्यंत दोघेही पोलिसांच्या ताब्यात होते.

या घटनेची नोंद गंगाखेड पोलिस ठाण्यात झाली आहे. दोघांपैकी एकाने त्यांच्या बॉटलमधील काळ्या रंगाचे द्रव्य पदार्थ (शाई) पालकमंत्र्यांच्या गाडीवर फेकले व दुसऱ्याने हातामध्ये रेड ऑक्साइड स्ट्राइक हाय ग्लोसचा डब्बा गाडीवर फेकल्याचे म्हटले. याप्रकरणी दोघांविरूद्ध कलम ११८ (१), १२५, २२१, ६२, ३ (५) भारतीय न्याय संहिताप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिली.

कर्जमाफीसाठी पालकमंत्र्यांवर शाईफेकीचा प्रयत्नपालकमंत्री मेघना बोर्डीकर जनता दरबाराच्या निमित्ताने गंगाखेडला आल्या असता, कार्यक्रमस्थळी त्यांच्या शासकीय वाहनावर दोघांनी शाई फेकली होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शेतकऱ्यांच्या भावना मी समजू शकते : बोर्डीकरशाई फेकण्याचा प्रकार हा शेतकऱ्यांच्या भावनेचा विषय आहे. ही भावना मी समजू शकते. यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ३१ हजार ६०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. गंगाखेड तालुक्यात तर ८३ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. परभणी जिल्ह्यासाठी ४२० कोटी रुपयांचे तातडीच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विरोधी पक्षातील मंडळी असे प्रकार करतात. यामुळे काही फरक पडत नाही. मूळ शेतकरी अत्यंत समाधानी असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री बोर्डीकर यांनी 'लोकमत'ला दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ink thrown at Minister's car over farmer loan waivers.

Web Summary : Parbhani's Minister's car was attacked with ink over delayed farmer loan waivers and crop insurance. Two individuals were arrested for the act, motivated by government inaction. The minister stated that she empathizes with the farmers' sentiments.
टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र