धर्मापुरीत सरपंचपदी दीक्षा पैठणे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST2021-02-12T04:16:47+5:302021-02-12T04:16:47+5:30

१० फेब्रुवारी रोजी येथील ग्रामपंचायतीत पीठासन अधिकारी आर. एन. पंडित, ग्रामसेवक बी. आर. जाधव यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात ...

Initiation as Sarpanch in Dharmapuri without opposition | धर्मापुरीत सरपंचपदी दीक्षा पैठणे बिनविरोध

धर्मापुरीत सरपंचपदी दीक्षा पैठणे बिनविरोध

१० फेब्रुवारी रोजी येथील ग्रामपंचायतीत पीठासन अधिकारी आर. एन. पंडित, ग्रामसेवक बी. आर. जाधव यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. त्यात सरपंचपदी दीक्षा पैठणे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी मतदान झाले. त्यात ११ पैकी ९ मते घेऊन तानाजी कदम यांची उपसरपंचपदी निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचासह सदस्य रंजना परमेश्वर ढाकरगे, गीता प्रभाकर जाधव, सीमा मंचक बैलवाडे, पार्वतीबाई अच्युतराव कदम, कमलबाई जयराम कदम, कमलबाई परसराम कदम, अकबर पठाण, सतीश गिरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजेपराव कदम, सुनील पांचाळ, ज्ञानोबा जंगाले, मुंजाजी कदम, तुकाराम मोळे, शाहूराव कदम, ताजखाँ पठाण, जय कदम, दिलीप देशमुख, परमेश्वर कदम, राजेभाऊ कदम, शिवा कदम, दीपक कदम, सतीश कदम, अंकुश कदम, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Initiation as Sarpanch in Dharmapuri without opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.