शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

१९ टक्के नागरिकांमध्ये वाढली प्रतिकारक्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST

परभणी : जिल्ह्यातील १९ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या विषाणूविरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता आपोआप वाढल्याचा निष्कर्ष केंद्र शासनाच्या आयसीएमआरने केलेल्या सर्वेक्षणातून निघाला ...

परभणी : जिल्ह्यातील १९ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या विषाणूविरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता आपोआप वाढल्याचा निष्कर्ष केंद्र शासनाच्या आयसीएमआरने केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे. हे प्रमाण समाधानकारक नसले तरी नागरिकांमध्ये ॲण्टीबॉडीज्‌ तयार होत असल्याचे या निष्कर्षावरून दिसून येत आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या चाचण्या वाढवून रुग्ण शोधले जात आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने केंद्र शासनाच्या आयसीएमआर पथकाने देशभरातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. त्यात नागरिकांमध्ये किती प्रमाणात ॲण्टीबॉडीज्‌ तयार होत आहेत, याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी राज्यातील ६ जिल्ह्यांंची निवड करण्यात आली. परभणी जिल्ह्यातही हे सर्वेक्षण केंद्राच्या पथकाने केले आहे. सुरुवातीच्या दोन टप्प्यात झालेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पथकाने जाहीर केले होते. २६ डिसेंबर रोजी केंद्राच्या पथकाने जिल्ह्यात तिसरे सर्वेक्षण केेले. या सर्वेक्षणामध्ये रॅण्डमली गावे आणि सर्वेक्षणासाठी नागरिकांची निवड करण्यात आली. प्रत्येक गावात ४० नागरिकांचे रक्तजल नमुने घेतले होते. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय गावांची निवड करण्यात आली. तर शहरी भागात प्रभागातील नागरिकांचे रक्तजल नमुने घेतले होते.

या सर्वेक्षणाचा अहवाल आयसीएमआरच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकांपैकी ४२६ जणांच्या नमुन्यांमध्ये ८१ जणांचे नमुने पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. हे प्रमाण १९ टक्के एवढे आहे. याचाच अर्थ या १९ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक्षमता वाढली आहे. या नागरिकांत आपोआप ॲण्टीबॉडीज्‌ तयार झाल्या असून, त्यांना कोरोना होऊन गेलेलाही समजला नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील १९ टक्के नागरिकांमध्ये ॲण्टीबॉडीज्‌ तयार झाल्या आहेत. हे प्रमाण कमी असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

१६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांत ॲण्टीबॉडीज्‌

सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत आरोग्य विभागात काम करणाऱ्या १६ टक्के नागरिकांमध्येच ॲण्टीबॉडीज्‌ विकसित झाल्याचाही निष्कर्ष या पथकाने काढला आहे. सर्वेक्षणादरम्यान ११८ आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्तजल नमुने पथकाने घेतले होते. त्यापैकी १९ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १६ टक्के एवढे आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिकारक्षमता वाढण्याचे प्रमाण सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत कमी असल्याचे अहवालावरून दिसत आहे.