जिल्ह्यात वाढले शेतीचे सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST2021-02-14T04:16:26+5:302021-02-14T04:16:26+5:30
पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी परभणी : जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त ...

जिल्ह्यात वाढले शेतीचे सिंचन
पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी
परभणी : जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे तक्रारीही नोंदविल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. कृषी विभागही याबाबत फारसा पाठपुरावा करीत नसल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपासून वंचित राहावे लागत आहे.
प्लास्टिकमुक्तीच्या ग्रामीण भागात प्रतिसाद
परभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्त गाव चळवळ राबविली जात आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच प्लास्टिक मुक्त गावाचे जनजागरण केले जात असून, ठिकठिकाण प्लास्टिक कचरा संकलित केला जात आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. तेव्हा न कुजणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले जात आहे.
वाहनतळांच्या जागांवर अतिक्रमण
परभणी : शहरात वाहनतळासाठी निश्चित केलेल्या जागांवर अतिक्रमण झाले असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेनेच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. मनपाने वाहनतळाच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी
परभणी : जिल्ह्यात सध्या रबीची पिके बहरात असून, या पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपाला दिवसा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, ग्रामीण भागात कृषिपंपाचा वीज पुरवठा दिवसभर खंडित ठेवून रात्रीच्या वेळी सुरू केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. महावितरण कंपनीने कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
चौक बनला धोकादायक
परभणी : येथील स्टेडियम परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यावर चौकाची निर्मिती न केल्याने हा परिसर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. चारही बाजूने एकाच वेळी वाहने या चौकात येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या ठिकाणी चौकाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.