प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST2021-05-03T04:12:45+5:302021-05-03T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागातील ११ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार ...

प्रवाशांची गैरसोय
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागातील ११ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
नांदेड विभागातील औरंगाबाद-नांदेड, नांदेड-औरंगाबाद, अदिलाबाद-नांदेड, परभणी-नांदेड, औरंगाबाद-रेणीगुंटा, रेणीगुंटा-औरंगाबाद, सिकंदराबाद-शिर्डी या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर तांदूर-परभणी व नांदेड-तांदूर या दोन रेल्वे अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे परभणीहून औरंगाबाद, नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. याबाबत दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने १ मे रोजी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. कमी प्रवासी संख्येमुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या सर्व विशेष रेल्वे गाड्या आहेत. पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने आहे त्यातील गाड्या बंद केल्याने गैरसाेय वाढणार आहे.