पालिकेच्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:52 IST2021-01-08T04:52:40+5:302021-01-08T04:52:40+5:30

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे, नगरसेवक विनोद राहाटे, राजू खरात, अनंत भदरगे, कार्यालयीन अधीक्षक शेषेराव बोरेवडे, अभियंता सय्यद ...

Inauguration of Municipal Cricket Tournament | पालिकेच्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

पालिकेच्या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे, नगरसेवक विनोद राहाटे, राजू खरात, अनंत भदरगे, कार्यालयीन अधीक्षक शेषेराव बोरेवडे, अभियंता सय्यद अन्वर, अमोल तांदळे, सुशील खोडवे, फड, पवार, जनार्दन कीर्तने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांनी युवा वर्गाने स्वच्छतेला सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. युवकांनी शिक्षण, संस्कृती, खेळ या सोबत स्वच्छतेलाही महत्त्व द्यावे असे आवाहन यावेळी केले. राजू खरात यांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत एकूण ४० संघ सहभागी झाले असून २६ जानेवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. सूत्रसंचालन पवन शिंगोटे यांनी केले तर आभार देवा पेडगावकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पप्पू गायकवाड, वसीम शेख , पंकज पवार, विकी नितनवरे, प्रसाद नेवरेकर, शुभम शिसोदे आदी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Inauguration of Municipal Cricket Tournament