शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत मोठे डावपेच; शिंदेसेनेच्या २, काँग्रेस १, भाजप १, जनसुराज्याच्या एका उमेदवाराची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:46 IST

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, उद्धवसेना व काँग्रेसने सर्वाधिक बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात यश मिळविले.

परभणी : महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षांनी अडचणीच्या उमेदवारांची माघार करून घेण्यात यश मिळविले. यामध्ये काही पक्षीय उमेदवारांनीही माघार घेतली. 

शिंदेसेनेच्या तब्बल २ उमेदवारांनी रिंगण सोडले. वाटाघाटीत प्रभाग १२ मध्ये युती झाल्याने भाजपच्या एका उमेदवारालाही रिंगण सोडावे लागले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, उद्धवसेना व काँग्रेसने सर्वाधिक बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात यश मिळविले. काही जण तरीही रिंगणात राहिले आहेत. ते किती परिणाम करतील, हे आगामी काळात कळणार आहे. प्रभाग १ मध्ये मात्र दिशा नितेश देशमुख व आकाश बहिरट या शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. बहुदा काँग्रेसने ही खेळी खेळून डाव साधल्याचे दिसत आहे, तर प्रभाग क्रमांक १२ क मध्ये ऐनवेळी युती झाल्याने भाजपने ॲड. नसरीन पठाण यांना माघार घ्यायला लावली, तर प्रभाग ३ ड मध्ये जनसुराज्यचे फेरोज खान खलंदर खान यांनी माघार घेतली. वंचित बहुजन आघाडीचे संदीप हिवाळे यांनी प्रभाग ६ ड मधून माघार घेतली आहे. १३ ड मधून काँग्रेसच्या रहेमान खान जावेद खान यांनी माघार घेतल्याने आणखी एक प्रभाग आघाडीत आला आहे. काँग्रेसला आणखी एका जागेचा फटका बसला असून, उद्धवसेनेने या प्रभागात दिलेल्या ३ उमेदवारांना हा काँग्रेसचा चौथा उमेदवार मिळाल्याने पॅनल पूर्ण झाले. उद्धवसेनेने टाकलेल्या मोहिनीत काँग्रेस पुरती अडकली असून, आता २७ जागांवरच उरली आहे.

प्रभाग ८ क मधून एमआयएमचे मोहम्मद अब्दुलाहा मोहम्मद इसाहख यांनी माघार घेतली आहे. प्रभाग ९ क मधून यशवंत सेनेच्या नौशाद बी शेख जलाल यांनी माघार घेतली आहे. १५ अ मधून रिपब्लिकन सेनेच्या आशा अहिरे तर १५ ई मधून अमोल कांबळे यांनी माघार घेतली.

शिंदेसेनेने केला भाजपचा गेमप्रभाग १२ मध्ये युती करणार असल्याचे सांगून भाजपच्या उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडले. मात्र शिंदेसेनेने आपला उमेदवार कायम ठेवून भाजपचा गेम केला आहे. आता भाजपचे २ आणि शिंदेसेनेचे ३ उमेदवार या प्रभागात असल्याने ही कोणती युती असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपने बंडखोरांची केली मनधरणीभाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरीचे पीक आले होते. यापैकी लक्ष्मीकांत क्षीरसागर, दिनेश नरवाडकर व इतर एक-दोन मात्र त्यांच्या हाती लागले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादीनेही बऱ्यापैकी बंडखोर थंड केले, तर काँग्रेससाठीही उद्धवसेनाच बंडखोरांना शांत करण्यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Elections: Major Maneuvering as Candidates Withdraw; Alliances Shift

Web Summary : Parbhani municipal elections saw strategic withdrawals on the last day. Shinde Sena, Congress, BJP, and Jansurajya candidates pulled out. Alliances shifted in wards 1 and 12, impacting party strategies. Internal dissent within parties was largely quelled, though some rebels remain.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६