संबरमधून अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:47+5:302021-09-02T04:38:47+5:30
परभणी : तालुक्यातील संबर येथून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात असून, तो बंद करा, अशी मागणी ...

संबरमधून अवैध वाळू उपसा
परभणी : तालुक्यातील संबर येथून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जात असून, तो बंद करा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
संबर परिसरातून पूर्णा नदी वाहते. या नदीपात्रातून अवैधरीत्या बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. हायवा, टिप्पर, ट्रॅक्टर या चारचाकी वाहनांसह २०० ते ३०० गाढवांचाही वाळू वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. चोरट्या मार्गाने होत असलेल्या वाळूच्या वाहतुकीमुळे गावातील व दलित वस्तीतील रस्ते खराब झाले आहेत. या वाळू चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी करूनही ती होत नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र, कारवाई होत नाही.
अवैधरीत्या वाळू उपशामुळे ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. त्याचप्रमाणे अनेकवेळा वाद व भांडणे होत आहेत.
विशेष म्हणजे, रात्री-बेरात्री हा वाळू उपसा केला जात आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येऊन चौकशी करावी आणि या वाळू उपशाविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संबर येथील सरपंच किरण गलांडे, उपसरपंच सुमनबाई पवार, सदस्य सरस्वती चव्हाण, प्रकाश चव्हाण, पद्मीनबाई चव्हाण, संताबाई मोरे आदींनी केली आहे.