अवैध दारू विक्री; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:30+5:302021-05-17T04:15:30+5:30
पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांना सेलू शहरातील वैतागवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती ...

अवैध दारू विक्री; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांना सेलू शहरातील वैतागवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून शनिवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात बालू साहेबराव काळे (वय ६५, रा. वालूर नाका, सेलू) हा मिळून आला. त्याच्या बांधकाम सुरू असलेल्या रूमची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी दारूच्या एकूण १०२ बाटल्या, किंमत पाच हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष बालाजीराव माळगे यांच्या फिर्यादीवरून एकजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अनंता थोरवट करीत आहेत.