मनपाच्या सेवांचा लाभ हवा, तर करा लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:29+5:302021-09-11T04:19:29+5:30
शहरात सध्या ४५ टक्क्यांच्या आसपास लसीकरण झाले आहे. अजून मोठा पल्ला गाठण्यासाठी मनपा प्रशासनाकडून लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे, यासह ...

मनपाच्या सेवांचा लाभ हवा, तर करा लसीकरण
शहरात सध्या ४५ टक्क्यांच्या आसपास लसीकरण झाले आहे. अजून मोठा पल्ला गाठण्यासाठी मनपा प्रशासनाकडून लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे, यासह प्रभागनिहाय जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासोबतच अन्य पर्याय मनपा प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवून आगामी काळात उपाययोजना करण्याचा विचार केला आहे. यात महापालिकेकडून दिले जाणारे जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, बांधकाम परवाना, विविध कारणांसाठी लागणाऱ्या एनओसी व योजनांचे अनुदान, तसेच अन्य कागदपत्र काढण्यासाठी अर्ज केल्यावर या सुविधा घेताना आता घरातील सदस्यांचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होऊ शकते.
नागरिकांनी पहिला किंवा दोन्ही डोस घेतलेल्या लसीकरणापैकी एक प्रमाणपत्र सादर करून आवश्यक असलेल्या मनपाच्या सेवेचा लाभ अर्ज सादर केल्यानंतर दिला जाणार आहे. लसीकरण करणाऱ्यांनाच विविध आवश्यक प्रमाणपत्रे सादर केली जातील.
- देविदास पवार, आयुक्त, मनपा.