सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश : सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:23 IST2021-02-26T04:23:38+5:302021-02-26T04:23:38+5:30
मानवत येथील केकेएम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंह बोलत होते. यावेळी ...

सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश : सिंह
मानवत येथील केकेएम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंह बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बी. एस. मुंडे, डॉ. धनंजय देवमाने, उपप्राचार्य डॉ. टी. व्ही. मुंडे, डॉ. किशोर हाेगे, डॉ. कैलास बोरुडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अमृतकुमार सिंह म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी यूपीएससी परीक्षेचे स्वरुप, तयारीची सर्वोत्तम पद्धत, विविध विषय घटकांचा अभ्यास करण्याचे तंत्र, येणाऱ्या काळात परीक्षा पद्धतीत होणारा बदल या अनुषंगाने मार्गदर्शन केले. डॉ. देवमाने यांनी कोरेानाच्या कठीण काळात संधीचे यशात रुपांतर करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. तुकाराम मुंडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. दुर्गेश रवंदे यांनी केले. आभार प्रा. सत्यनारायण राठी यांनी मानले.