समाज एकत्र आला तर प्रगती निश्चित- उपगुप्त महास्थवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:19+5:302021-06-27T04:13:19+5:30
परभणी शहरातील अजिंठा नगर येथे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून रुपये २५ लाख रुपये खर्च करून ...

समाज एकत्र आला तर प्रगती निश्चित- उपगुप्त महास्थवीर
परभणी शहरातील अजिंठा नगर येथे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून रुपये २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या वज्र आसन सभामंच पायाभरणी समारंभप्रसंगी भदंत डॉ. उपगुप्त महास्थवीर बोलता होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. राहुल पाटील, भदंत कश्यप महाथेरो, भदंत मुदीतांनद थेरो, महापौर अनिताताई रवींद्र सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, बांधकाम सभापती गवळणताई रोडे, रवींद्र सोनकांबळे, ज्येष्ठ नेते बी. एच. सहजराव, डी. एन. दाभाडे, डॉ. विवेक नावंदर,डॉ. प्रकाश डाके, डॉ.बी. टी. धुतमल, गौतम मुंढे, महेमुद खान, मुजाहेद खान, सुशील कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ. डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शहरातील विकास कामांना आपले नेहमीच प्राधान्य राहणार आहे. विकास कामांसाठी निधीची कमतरता पडून देणार नाही. यावेळी ॲड. मोती शिंदे, करण गायकवाड, भीमप्रकाश गायकवाड, प्रशांत ठाकूर, गौतम भराडे, सुभाष जोंधळे, यशवंत खाडे, अमोल गायकवाड, भगवान घुबडे, लक्ष्मीकांत धुतराज, द्वारकाबाई गंडले, नंदा गायकवाड, मुळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कोषागार अधिकारी ज्योतीताई बगाटे यांनी केले.