विजेअभावी उकाड्यात काढावी लागली रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST2021-05-10T04:16:49+5:302021-05-10T04:16:49+5:30
परभणी : शनिवारी मध्यरात्री शहरातील वीजपुरवठा अचानक गायब झाल्याने नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली. महावितरणच्या या कारभारावर नागरिकांतून संताप ...

विजेअभावी उकाड्यात काढावी लागली रात्र
परभणी : शनिवारी मध्यरात्री शहरातील वीजपुरवठा अचानक गायब झाल्याने नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली. महावितरणच्या या कारभारावर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
परभणी शहरात शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा गायब झाला. पंधरा ते वीस मिनिटात हा वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र, मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला. हा पुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत पूर्ववत झाला नव्हता. त्यामुळे या नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली. विशेष म्हणजे वादळ वारे नसतानाही वीज पुरवठा मात्र खंडित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. त्याचप्रमाणे उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.