पत्नीचा खून करून पतीनेच फेकला होता मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST2021-03-07T04:16:47+5:302021-03-07T04:16:47+5:30

तालुक्यातील निपाणी टाकळी शिवारातील कालव्यात एका अनोळखी महिलेचा खून करून, मृतदेह दुचाकीवर आणून पोत्यात बांधून फेकण्यात आल्याची घटना शुक्रवारी ...

The husband had killed his wife and dumped her body | पत्नीचा खून करून पतीनेच फेकला होता मृतदेह

पत्नीचा खून करून पतीनेच फेकला होता मृतदेह

तालुक्यातील निपाणी टाकळी शिवारातील कालव्यात एका अनोळखी महिलेचा खून करून, मृतदेह दुचाकीवर आणून पोत्यात बांधून फेकण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत तपासाची चक्रे फिरविली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच महिलेची ओळख पटवून आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यानुसात मयत महिलेचे नाव पूजा उमेश मगर (२५) असून, ही महिला मानवत तालुक्यातील करंजी येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा आणि उमेश यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. गुरुवारी कामासाठी पूजा, पती उमेश आणि त्याचा मित्र गणेश पितळे हे मुंबईला जाणार होते. पती-पत्नीत वाद झाल्याने पती उमेश याने पूजा यांना बेदम मारहाण करून घरात गळफास देऊन मृतदेह निपाणी टाकळी शिवारातील कालव्यात मित्र गणेश याला सोबत घेऊन फेकला. त्यानंतर, दोघेही फरार झाले. पूजाचे सासरे बाबू देवीदास मगर हे सून बेपत्ता असल्याची तक्रार मानवत पोलिसात देण्यासाठी शुक्रवारी सकाळी गेले होते. हा धागा पकडून पोलिसांनी तपास करीत या खूनाचा छडा लावला आहे. सेलू पोलिसात पती उमेश बाबू मगर आणि त्याचा मित्र गणेश पितळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना मुंबईतील बोरीवली येथून अटक केली आहे.

Web Title: The husband had killed his wife and dumped her body