पतीने केली पत्नीस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:34+5:302021-05-27T04:19:34+5:30
तालुक्यातील सुरळवाडी येथील कालिंदा व्यंकटी मलगे यांचे पती व्यंकटी पांडुरंग मलगे यांनी १३ मे रोजी दुपारी घरी कोणी ...

पतीने केली पत्नीस मारहाण
तालुक्यातील सुरळवाडी येथील कालिंदा व्यंकटी मलगे यांचे पती व्यंकटी पांडुरंग मलगे यांनी १३ मे रोजी दुपारी घरी कोणी नसताना चारित्र्याच्या संशयावरून तू गावातील लोकांना का बोलतेस, असे म्हणून पत्नीला शिवीगाळ केली. तेव्हा शिवीगाळ करू नका, असे पत्नी कालिंदा व्यंकटी मलगे यांनी म्हणताच, व्यंकटी मलगे यांनी पत्नीस मारून गंभीर जखमी केले. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने परळी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन परतलेल्या कालिंदा व्यंकटी मलगे यांनी २६ मे रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पती व्यंकटी पांडुरंग मलगे याच्याविरुद्ध १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबूराव घरजाळे, पोलीस नाईक सुनील लोखंडे करीत आहेत.