परभणी शहरातील क्रीडा विभागाच्या वसतिगृहास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:58 IST2018-01-02T23:58:23+5:302018-01-02T23:58:44+5:30
शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या क्रीडा विभागाच्या वसतिगृहास २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या ठिकाणी खेळाडू वास्तव्यास नसल्याने अनर्थ टळला.

परभणी शहरातील क्रीडा विभागाच्या वसतिगृहास आग
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या क्रीडा विभागाच्या वसतिगृहास २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या ठिकाणी खेळाडू वास्तव्यास नसल्याने अनर्थ टळला.
परभणी जिल्हा स्टेडियम परिसरात नवीन बॅडमिंटन हॉलच्या शेजारी विद्यार्थ्याना थांबण्यासाठी नव्याने वसतिगृह बांधले आहे. या वसतिगृहातील एका गोदामात गाद्या आणि इतर साहित्य ठेवले होते. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या साहित्यास आग लागली. वसतिगृहाच्या खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत असल्याने येथील नागरिकांनी अग्नीशमन दलात घटनेची माहिती दिली.
अवघ्या दहा मिनिटात अग्नीशमन दल या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.
दोन दिवसांपूर्वीच शहरात राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. या स्पर्धेसाठी आलेले खेळाडू याच वसतिगृहात थांबले होते. सोमवारी हे वसतिगृह रिकामे झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.