सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:57+5:302021-08-26T04:20:57+5:30
परभणी : सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, एखाद्याच्या भावना दुखावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे या पोस्ट ...

सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी !
परभणी : सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, एखाद्याच्या भावना दुखावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे या पोस्ट टाकताना टाकताना पुरेशी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी आता अनेक जण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरतात. भावनांच्या आहारी जाऊन अनेकवेळा आक्षेपार्ह पोस्ट, वादग्रस्त भाषणे टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात अशा प्रकरणांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी असले तरी टाकलेल्या पोस्टवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यामुळे अशा पोस्ट टाकण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज आहे.
तलवारीने केक कापण्याची फॅशन
n अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापण्याची फॅशन निर्माण झाली आहे.
n अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचा प्रकार जिल्ह्यात घडलेला नाही.
n मात्र असा प्रकार केल्यास तो अंगलट येऊ शकतो.
बदनामीच्या पोस्ट
तलवार, बंदूक घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या एकाही प्रकाराची पोलीस ठाण्यात नोंद नाही.
मात्र, आक्षेपार्ह भाषणांचे व्हीडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
त्यामुळे अशा पोस्ट टाकताना नेटकऱ्यांना काळज घ्यावी लागणार आहे.
लाईक करणारेही
येणार अडचणीत
n सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या समूहाची, व्यक्तीची बदनामी होत असले तर सायबर कायद्यांतर्गत तो गुन्हा ठरतो.
n सोशल मीडियावरील अशा पोस्ट, त्यावर येणारे कमेंटस्वर पोलीस दलातील सायबर विभागाचे बारकाईने लक्ष असते.
n त्यामुळे सोशल मीडियावर अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध तर गुन्हा नोंद होतोच शिवाय या प्रकाराला समर्थन देणाऱ्या लाईक्स् आणि कमेंटस् करणारे देखील अडचणीत येऊ शकतात.
n या बाबी सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने ध्यानात घ्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.