एप्रिल महिन्यात वाढले सर्वाधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:28+5:302021-05-17T04:15:28+5:30
मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक महिन्यात बाधित रुग्णांची नोंद होत आहे. मागील वर्षीच्या ...

एप्रिल महिन्यात वाढले सर्वाधिक रुग्ण
मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक महिन्यात बाधित रुग्णांची नोंद होत आहे. मागील वर्षीच्या एप्रिल ते डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोनाची पहिली लाट होती. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातील हा संसर्ग कमी होत असला तरी दुसऱ्या लाटेमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक २२ हजार ९८१ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात ३३५, फेब्रुवारीमध्ये ६४० तर मार्च महिन्यात ६ हजार ७४७ रुग्ण नोंद झाले.
कोरोनाचा हा संसर्ग सध्या कमी झाला आहे. १३ मे पर्यंत जिल्ह्यात ७ हजार ९८ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ३५३ रुग्ण नोंद झाले असून, त्यापैकी २२ हजार ९८१ रुग्ण एकट्या एप्रिल महिन्यातील आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेत एप्रिल महिना जिल्ह्यासाठी तापदायक ठरला.
कोरोनाचा संसर्ग घटला
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक २ हजार ५८० रुग्णांची नोंद झाली होती. मात्र दुसऱ्या लाटेत हा संसर्ग झपाट्याने वाढत गेला आणि एप्रिल महिन्यात २२ हजार ९८१ रुग्णांची नोंद झाली. मात्र सध्या हा संसर्ग कमी होत आहे. १३ मेपर्यंत केवळ ७ हजार ९८ रुग्णांची नोंद झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
८९३ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात दुसऱ्याला लाटेत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. १३ मेपर्यंत ८९३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यात एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यात १३५ तर फेब्रुवारी महिन्यात १६ रुग्णांचे मृत्यू झाले. १३ मेपर्यंत ३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.