गरजू महिलेला शेळीच्या पिल्लांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:28+5:302021-04-15T04:16:28+5:30

महापुरुषांची जयंती आणि सण-उत्सव निराधार महिलांना मदत करून साजरे करण्याचा उपक्रम शेक हँड फाउंडेशनच्या वतीने राबविला जात आहे. डॉ.बाबासाहेब ...

Helping a needy woman with goats | गरजू महिलेला शेळीच्या पिल्लांची मदत

गरजू महिलेला शेळीच्या पिल्लांची मदत

महापुरुषांची जयंती आणि सण-उत्सव निराधार महिलांना मदत करून साजरे करण्याचा उपक्रम शेक हँड फाउंडेशनच्या वतीने राबविला जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सेलू तालुक्यातील माले टाकळी येथील सुनीता पांडुरंग गायकवाड या महिलेस शेळी व एक पिल्लू वाटप करण्यात आले. सुनीता गायकवाड या जन्मत मूकबधिर आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेक हँड फाउंडेशनने ही मदत केली आहे. सुनील यादव, रंजिता मस्के, छाया गायकवाड, शोभा घोगरे, रोहिदास कदम, नागेश गंगथडे, रामेश्वर ढोणे, मुंजा लोलगे, अर्चना भारस्वाडकर, अनंत कुलकर्णी, दिवाकर जोशी, रामेश्वर जाधव, नितीन तांदळे आदी सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रम प्रसंगी सरपंच बाबाराव ताठे, उपसरपंच अंबादास ताठे, पांडुरंग ढगे, दिलीप बेदरकर, सर्जेराव सोळंके, खरात, मुंजाभाऊ शिळवणे, कृष्णा पांचाळ, संतोषकुमार चव्हाण, शरद लोहट आदींची उपस्थिती होती.

Web Title: Helping a needy woman with goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.