निराधार महिलेस ‘शेक हॅण्ड’ची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:39+5:302021-04-12T04:15:39+5:30
शेक हॅण्ड फाउण्डेशनच्या वतीने प्रत्येक सण आणि महापुरुषांची जयंती निराधारांना मदत करून साजरी केली जाते. महात्मा जोतिबा फुले यांची ...

निराधार महिलेस ‘शेक हॅण्ड’ची मदत
शेक हॅण्ड फाउण्डेशनच्या वतीने प्रत्येक सण आणि महापुरुषांची जयंती निराधारांना मदत करून साजरी केली जाते. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आणि संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रविवारी उमरी येथील आशाताई मारोती माने या निराधार महिलेस पिठाची गिरणी देण्यात आली. या महिलेस उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, या उद्देशाने ही मदत देण्यात आली. आशाताई माने यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी ही शेक हॅण्डचे सदस्य प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच जगन्नाथ गोरे, कृषी अधिकारी गंगाधर मोरे, केंद्रप्रमुख नारायण भोसले, ग्रामपंचायत सदस्य अशोक गोरे, प्रसाद गोरे, मुंजाभाऊ गोरे, संजय गोरे, मुख्याध्यापक सतीश जांभळे, गोपाळ गोरे, संतोष चव्हाण, भास्कर वाघ, विकास लोहट, शरद लोहट आदींची उपस्थिती होती.